नवी दिल्ली
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शनिवारी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱयावर रवाना झाले. परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच सौदी अरेबिया दौरा आहे. या दौऱयात ते सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार आहेत. ते दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. प्राथमिक टप्प्यात असलेल्या काही चर्चा पुढे नेण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जपानच्या दौऱयावर गेले होते. जपानच्या दौऱयात त्यांनी टू प्लस टू चर्चेच्या माध्यमातून नव्या करारांना मूर्त स्वरुप दिले.









