वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विनामूल्य आधार कार्ड अपडेट करण्यासाठीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. आता आधार कार्ड 14 डिसेंबरपर्यंत विनामूल्य अपडेट केले जाऊ शकते. प्रथम सरकारने 14 जून 2023 पर्यंत कालावधी दिला होता. नंतर त्यात 14 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. आता तो 14 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्यांच्या आधार कार्डांतील माहितीमध्ये काही चुका झाल्या आहेत, यांना त्या चुका ऑनलाईन विनामूल्य सुधारता येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.









