पथविक्रेत्यांना लाभ घेण्याचे आवाहन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
केंद्र शासनाने नुकताच पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) या योजनेचा कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरुन वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेंगुर्ला शहरातील पथविक्रेत्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदे मार्फत मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.केंद्र शासनाने नुकताच पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) या योजनेचे कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरुन वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक फेरीवाले त्यामध्ये भाजीपाला, फळे विकणारे, मासे विक्री करणारे, खाद्यपदार्थ विकणारे, हातगाडीधारक असे रस्त्याच्या दुतर्फा बसणारे फेरेवाले यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या योजनेत सुधारणा करुन कर्जमर्यादा रु. १००००/- वरुन रु. १५०००/- आणि दुस-या टप्प्यातील कर्जमर्यादा रु. २००००/- वरुन रु. २५०००/- एवढी वाढविण्यात आली आहे. तिस-या टप्प्यातील कर्जमर्यादा ५००००/- आहे. डिजिटल व्यवहार करणा-या फेरेवाल्यांना कॅशबॅक मिळणार आहे.









