पाकिस्तान सोबतच्या तणावाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानसोबत युद्धसदृश स्थितीनंतर आता सीमेवर स्थिती सामान्य होत असल्याचे चित्र आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान सरकारने इंटेलिजेन्स ब्युरो (आयबी)च्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढविला आहे. आयबी प्रमुख तपम कुमार डेका यांना मंगळवारी एक वर्षाचा सेवाविस्तार देण्यात आला आहे. त्यांचा कार्यकाळ आता जून 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहे. कार्मिक मंत्रालयाने एक आदेश जारी करत ही माहिती दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आयबी संचालक म्हणून डेका यांच्या सेवेत एक वर्षाच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. हा सेवाविस्तार 30 जून 2025 पासून लागू होणार आहे. 62 वर्षीय डेका हे हिमाचल प्रदेश कॅडरच्या 1988 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून त्यांचा हा दुसरा कार्यकाळ विस्तार आहे.
डेका यांना जून 2022 मध्ये दोन वर्षांसाठी आयबी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मागील वर्षी जूनमध्ये देखील त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढविण्यात आला होता. डेका यांना विशेषकरून जम्मू-काश्मीरसोबत देशाच्या ईशान्य क्षेत्रात ‘ऑपरेशन’चा तज्ञ मानले जाते. आयबीची धुरा सांभाळण्यापूर्वी तपन कुमार हे दोन दशकांपेक्षा अधिक काळापर्यंत आयबीच्या संचालन विंगचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. डेका 2008 साली 26/11 च्या मुंबई हल्ल्यादरम्यान प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईचे प्रभारी देखील राहिले आहेत. याचबरोबर दहशतवाद आणि धार्मिक कट्टरवादाशी संबंधित प्रकरणे हाताळण्याचे कौशल्य असलेल्या डेका यांनी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील अभियानाचे नेतृत्व देखील केले आहे.
ब्









