बेळगाव : संततधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने बेळगाव, खानापूरसह सहा तालुक्यांतील शाळांना आणखी दोन दिवस सुटी वाढवली आहे. बेळगाव, खानापूर, बैलहोंगल व कित्तूर या चार तालुक्यांत पदवीपूर्व कॉलेजनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी सायंकाळी यासंबंधी आदेश जारी केला आहे. बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर, चिकोडी व निपाणी या सहा तालुक्यात अंगणवाडी, सर्व सरकारी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी असणार आहे. गुरुवार दि. 25 व शुक्रवार दि. 26 जुलै असे दोन दिवस सुटी घोषित करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने दिलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब करून सहा तालुक्यात सुटी जाहीर केली आहे.
Previous Articleदोघा अट्टल चोरांकडून सात लाखांच्या दहा मोटारसायकली जप्त
Next Article हिडकल जलाशयाचे सर्व दरवाजे खुले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.