ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकामागोमाग एक असे ४० आमदार शिंदेंबरोबर गेले. त्यामुळं ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. यांनतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यास सुरूवाल केली. आता सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून सातत्याने बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यात आता शिंदे गटात सामील झालेले मंत्री उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. तसेच उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हे ही वाचा : मुंबईतील पंचतारांकित ललित हॉटेल बॉम्बने उडविण्याची धमकी
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर उदय सामंत अवघ्या काही दिवसांत शिंदे गटात सामील झाले, जो शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातील खातेवाटपात उदय सामंत यांनी उद्योग मंत्रीपद देण्यात आले, यानंतर आता त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी देखील शिंदे गटाला पाठींबा दिल्याने त्यांची शिवसेनेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.