आत्मसन्मान अन् संतुष्टतेची भावना बळावते
अलिकडेच झालेल्या अध्ययनात लोकांना धन्यवाद पत्र लिहिणे, जीवनात घडलेल्या सकारात्मक गोष्टींची यादी आणि त्यांचा प्रभाव जाणून घेण्यास सांगण्यात आले. अशाप्रकारच्या कृत्यांमुळे मानसिक आरोग्य मिळाल्याचे तसेच नैराश्य अन् चिंतेत घट झाल्याचे या अध्ययनाच्या निष्कर्षांमध्ये दिसून आले आहे. याचबरोबर आभार व्यक्त केल्याने आत्मसन्मानात वाढ होण्यासह दैनंदिन जीवनात संतुष्टतेची पातळी वाढल्याचे आढळून आले.
परिचित, मित्र किंवा जोडीदाराबद्दल आभार व्यक्त करण्याचे कृत्य नाते मजबूत करते. जे लोक आभार व्यक्त करण्यावर अधिक भर देतात, त्यांचे मानसिक अन् शारीरिक आरोग्य उत्तम राहत असल्याचा दावा नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील मानसोपचारतज्ञ सारा एल्गो यांनी केला आहे. कुणाहीबद्दल आभार व्यक्त करणे संबंधिताला मानसशास्त्राच्या दृष्टीने मजबूत करत असल्याचे मनोवैज्ञानिक रॉबर्ट ए. एमन्स यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अध्ययनात दिसून आले आहे.

आभार व्यक्त करण्याचा दृष्टीकोन बाळगल्याने भावनात्मक आरोग्यासोबत परस्पर संबंधांवरही सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे अनेक अध्ययनांमधून सिद्ध झाले आहे. आभार ही सकारात्मक भावना आहे. जीवनात चांगले घडतेय आणि याकरता एखादी व्यक्ती किंवा अदृश्य शक्तीने मदत केल्याचा विश्वास संबंधिताला असतो तेव्हा आभाराची भावना निर्माण हेत असल्याचे डॉ.एमन्स यांनी सांगितले आहे.
कृतज्ञतेची भावना जाणवणे नाण्याची एक बाजू आहे. या भावनेचा लाभ घेण्यासाठी आभार व्यक्त करणेही तितकेच महत्त्वपूर्ण असल्याचे वक्तव्य ईस्टर्न वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राचे प्राध्यापक फिलिप वॉटकिन्स यांनी केले आहे. दिवसात कमीत कमी एकेवळा कुणाहीबद्दल आभार व्यक्त करावेत. याची कायमस्वरुपी सवय लावून घेण्यासाठी याला दिनक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. याकरता दीर्घ पत्र लिहिण्याची गरज नाही, छोटा ई-मेल किंवा मेसेज देखील उपयुक्त असल्याचे मानसशास्त्राचे तज्ञ जोएल वोंग यांनी म्हटले आहे.









