Express yourself, evoke memories; A unique initiative of Komsap
कोकण आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की सर्वप्रथम महाराष्ट्रात अग्रक्रमाने नाव घेतले जाते .ते संस्थानकालीन सावंतवाडी शहराचे हे शहर लाकडी खेळण्यासाठी जग प्रसिद्ध शहर म्हणून ओळखले जात आहे. अशा या सुंदर वाडी सावंतवाडी शहराची जुनी ओळख आगळी वेगळी होती .या जुन्या सावंतवाडी बद्दल व्यक्त व्हा आठवणी जागवा जुन्या सावंतवाडी शहराच्या असा नाविन्यपूर्ण उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषदे सावंतवाडी शाखेच्या वतीने घेण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सावंतवाडी येथील केशवसुत कट्ट्यावर जुन्या जाणत्या व्यक्तीने अनुभवली . सावंतवाडी त्यांनी आपल्या शब्दात सावंतवाडीच्या आठवणी जागवायच्या आहेत .असा हा उपक्रम घेण्यात येणार आहे .अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत यांनी दिली . कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखे ची बैठक सावंतवाडी येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील कक्षात घेण्यात आली या बैठकीत व्यक्त व्हा आठवणी जागवा जुन्या सावंतवाडीच्या असा उपक्रम घेण्याबाबत नियोजन करण्यात आले .
या उपक्रमात सहभाग घेऊन आठवणी जागवाव्यात ज्यांना आपल्या आठवणी जागवायच्या आहेत त्यांनी आपली नावे सहसचिव राजू तावडे 9422584407 व विनायक गावस , ऍड नकुल पार्सेकर याच्याकडे 15 नोव्हेंबर पर्यंत आपली नावे नोंदवावी तसेच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा च्या सदस्यांकडे नावे द्यावीत. असे आवाहन करण्यात आलंय .
सावंतवाडी / प्रतिनिधी