ऑगस्टमध्ये 6.7 टक्क्यांनी वधारली : वाढीसह निर्यात 35.1 अब्ज डॉलर्सवर
नवी दिल्ली :
देशात तसेच जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात अनिश्चित कालावधी असल्यानेही भारतीय व्यापारी क्षेत्रात चिंता निर्माण झाली होती. मात्र ऑगस्टमध्ये निर्यात 6.7 टक्क्यांनी वधारली, व्यापारी तोटाही कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात वस्तूंची निर्यात 6.7 टक्क्यांनी वाढून 35.10 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे. निर्यातीमध्ये जागतिक पातळीवरील अस्थिर वातावरण आणि अमेरिककडून लागू करण्यात आलेले आयात शूल्क यामुळे काहीसा व्यापारी क्षेत्रात दबाव होता. मात्र यामध्येही भारतीय निर्यातीची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. निर्यातीचा हाच आकडा मागील वर्षातील ऑगस्टमध्ये 32.09 अब्ज डॉलरपेक्षा कमी निर्यात झाली होती. तर चालू वर्षातील जुलैमध्ये देशातील 37.24 अब्ज डॉलर किंमतीची निर्यात करण्यात आली होती.
वाणिज्य विभागाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतावर शूल्क आकारल्याने अमेरिकेमध्ये 7.15 टक्क्यांनी वधारुन 6.86 अब्ज डॉलर राहिले आहे. यावर ऑगस्टमध्ये झालेल्या तेजीने अमेरिकेमध्ये निर्यात 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. मार्चमध्ये अमेरिकेत सर्वाधिक 10.15 अब्ज डॉलर मूल्यच्या वस्तूंची निर्यात केली होती.









