वाणिज्य मंत्रालयाची माहिती ः मागील आर्थिक वर्षातील आकडेवारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील समुद्री उत्पादनांची निर्यात ही आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जवळपास 30.26 टक्क्यांनी वधारुन 7.76 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताकडून 13,69,264 टन समुद्री खाद्य उत्पादनांची निर्यात करण्यात आली असून यांचे मूल्य 57,586.48 कोटी रुपये राहिले आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ही निर्यात 5.96 अब्ज डॉलर्सची होती.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील आर्थिक वर्षाच्या दरम्यान समुद्री उत्पादनांच्या निर्यातीत रुपयाच्या संदर्भात 31.71 टक्के, डॉलरमध्ये 30.26 टक्के व आकडेवारीच्या संदर्भात पाहिल्यास यात 19.12 टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारताची सर्वोच्च कामगिरी
भारताने मागील आर्थिक वर्षामध्ये 7.76 अब्ज डॉलरची सर्वोच्च यशस्वी निर्यात करण्यात आली असल्याचे समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एन. राघवन यांनी म्हटले आहे. समुद्री उत्पादनांमध्ये फ्रोजन झींगा आणि त्याचे मूल्य पाहिल्यास हे सर्वात वरचे राहिले आहे. मागील आर्थिक वर्षात याची निर्यात 5.82 अब्ज डॉलरवर राहिली होती.
फ्रोजन झींग्याचा सर्वात मोठा बाजार हा अमेरिका आहे. त्यापाठोपाठ चीन, युरोपीयन संघ, दक्षिण पूर्व आशिया, जपान आणि पश्चिम आशियाचे स्थान येते.
अमेरिका 3.37 अब्ज डॉलरच्या आयातीसह भारतीय समुद्री भोजनात प्रमुख आयातक देश बनला आहे. अमेरिका डॉलर मूल्याच्या संदर्भात 37.56 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. तर चीन 1.17 अब्ज डॉलर मूल्यासोबत 2,66,989 टन आयातीसोबत भारताचा दुसरा सर्वात मोठा समुद्री खाद्य निर्यातक आहे.









