मुंबई :
उत्पादन प्रोत्साहन योजनेचा (पीएलअय) लाभ उठविणाऱ्या अॅपल कंपनीने अलिकडेच 2 अब्ज डॉलर्सच्या आयफोन्सची निर्यात केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये पहिल्या दोन महिन्यात कंपनीने 16500 कोटी रुपयांच्या आयफोन्सची निर्यात केली आहे. एकंदर आयफोन निर्मितीची संख्या पाहता 80 टक्के आयफोन्सची निर्यात अॅपलने भारतातून करण्यात आली आहे. यामध्ये फॉक्सकॉन कंपनीचा निर्मितीतील वाटा 65 टक्के इतका दिसून आला आहे. 2024 च्या आर्थिक वर्षात अॅपलने भारतात 14 अब्ज डॉलर्सच्या आयफोन्सची निर्मिती केली होती.









