नवी दिल्ली
या वर्षी सप्टेंबरमध्ये देशाची निर्यात 2.6 टक्क्यांनी घसरून 34.47 अब्ज डॉलरची झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात निर्यात 35.39 अब्ज डॉलरची होती.
शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये आयातही 15 टक्क्यांनी घसरून 53.84 अब्ज डॉलरची झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ते 63.37 अब्ज डॉलरची होती. यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये व्यापार तूट 19.37 अब्ज डॉलर इतकी होती. आर्थिक वर्षामध्ये एप्रिल-सप्टेंबर दरम्यान निर्यात घसरून 211.4 अब्ज डॉलरची झाली आहे.









