कोईम्बतूर
कोईम्बतूर येथे झालेल्या कार बॉम्बस्फोटात ठार झालेल्या जेमिशा मुबीनच्या घराची झडती घेतली असता पोटॅशियम नायटेट, ब्लॅक पावडर, नायट्रोग्लिसरीन, पेंटेएरिथ्रिटॉल टेट्रानायटेट पावडर, सल्फर पावडर आणि ऍल्युमिनियम पावडरसह 109 वस्तू सापडल्या आहेत. तसेच काही वहय़ा-डायऱयाही सापडल्या असून त्यात जिहादविषयक माहिती आणि महत्त्वाच्या नोंदी आढळल्याचे एनआयएच्या अधिकाऱयांनी सांगितले. एनआयएने याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. कार बॉम्बस्फोटप्रकरणी आतापर्यंत मुबीनच्या सहा साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हे सर्व संशयित दक्षिण भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय असल्याचे आढळून आले आहे.









