पोलिसांची मोठी कारवाई
छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्dयात पोलिसांनी एका तपासणी नाक्यावर वाहन तपासणी करत असताना एका ट्रकमधून 33 लाख रुपयांची स्फोटक सामग्री जप्त केली आहे. तसेच ट्रकचालक आणि त्याच्या हेल्परला अटक केली आहे. तुगवां येथील वाहन तपासणी नाक्यावर पोलिसांनी मध्यप्रदेशकडून येत असलेल्या एका ट्रकला रोखले होते. या ट्रकच्या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे.
ट्रकमध्ये टायगर एक्स्प्लोसिव्ह 120 बॉक्स आढळून आले असून याचे वजन सुमारे 3 हजार किलोग्रॅम इतके होते. तर टायगर पॉवर 90 एक्स्प्लोसिव्हचे 40 बॉक्स हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांचे एकूण वजन 1 हजार किलोग्रॅम इतके होते. डीएफइंडोकार्डचे 8 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या स्फोटकांच्या वाहतुकीसंबंधी कुठलीच कागदपत्रे चालकाकडे नव्हती. पोलिसांनी या गंभीर प्रकरणी गुन्हा नोंदवत ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. ही स्फोटकं डीलिंग अणि ब्लास्टिंगसाठी नेण्यात येत होती अशी माहिती ट्रकचालकाने चौकशीदरम्यान दिली आहे.









