श्वानपथकासह पोलिसांची खबरदारी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी पोलीस दलाने व्यापक खबरदारी घेतली असून गणेश मंडप परिसरात श्वानपथकाकडूनही तपासणी केली जात आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशनसह वर्दळीच्या ठिकाणी नेहमी स्फोटक शोधक पथक व श्वानपथकांकडून तपासणी केली जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मंडप परिसराचीही तपासणी करण्यात येत आहे. मेटल डिटेक्टरचाही तपासणीसाठी वापर करण्यात येत आहे. स्फोटक शोधक पथकातील अधिकारी व कर्मचारी शहरातील वेगवेगळ्या मंडपांना भेटी देऊन तपासणी करीत आहेत.









