आगीचा उडाला भडका
प्रतिनिधी
बांदा
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या कँटीन मध्ये सायंकाळी स्फ़ोट झाला. स्फ़ोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या स्फ़ोटानंतर आगीचा मोठा भडका उडाला. सुदैवाने कॅन्टीन बंद असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कॅन्टीन चे मोठे नुकसान झाले. स्फ़ोटाचे वृत्त समजताच मोठी गर्दी झाली आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.









