स्टीम पाईप फुटल्याने 18 जण जखमी
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाच्या ढेंकनाल जिह्यातील टाटा स्टीलच्या मेरामंडली प्लान्टमध्ये स्टीम पाईप फुटल्याने 18 जण जखमी झाले. या दुर्घटनेत आगीच्या ज्वालांमुळे गंभीरपणे इजा झालेल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर कटकमधील एका खासगी ऊग्णालयात उपचार सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. जखमींपैकी दोघे गंभीर असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. टाटा स्टीलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेंकनाल येथील टाटा स्टील मेरामंडलीच्या ब्लास्ट फर्नेस पॉवर प्लान्टच्या तपासणीदरम्यान मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, राज्य सरकार आणि कंपनीने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.









