जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधात सैन्याने शनिवारी पुन्हा कारवाई केली आहे. किश्तवाड येथे राहून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी एका मौलवीला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. 22 वर्षीय मौलवी अब्दुल वाहिद हा काश्मिरी जांबाज फोर्स या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. अब्दुल वाहिद हा किश्तवाड येथे राहून सैन्य तसेच प्रशासनाशी निगडित गोपनीय माहिती प्राप्त करत ती पाकिस्तानपर्यंत पोहोचवित होता. याचबरोबर तो आयएसआयच्या संपर्कात होता. वाहिदला अटक केल्यावर सुरक्षा दलांनी संबंधित परिसरातील सुरक्षा वाढविली आहे.









