सहारनपूर :
उत्तरप्रदेशच्या सहारनपूर येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तर दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी हा विस्फोट कटाच्या अंतर्गत घडवून आणल्याचा आरोप करत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. कारखान्यात काही बाहेरील लोक काम करत होते, ते सुरक्षित आहेत, तर स्थानिक कामगारांचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच ग्रामस्थांनी तीन संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.









