रत्नागिरी :
अखिल भारतीय मराठी नाट्या परिषद रत्नागिरी यांच्यावतीने नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति नाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े या स्पर्धेत इंद्रधनु प्रतिष्ठान पानवल घवाळीवाडी यांच्या ‘एक्सपायरी डेट’ने प्रथम क्रमांक पटकावल़ा तर द्वितीय क्रमांक नूतन बालमित्र बोरकर नाट्या मंडळ वरवडेचे ‘मी तर बुवा अर्धा शहाणा’, तर तृतीय क्रमांक गणेश प्रासादिक नाट्यामंडळ गणपतीपुळेच्या ‘मोऊची मावशी’ने पटकावल़ा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रशांत घवाळी, उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रक्षिता पालव, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आदित्य बापट यांना गौरवण्यात आल़े
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यागृह येथे अखिल भारतीय मराठी नाट्या परिषद शाखा रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित कोकणातील उत्सवात होणाऱ्या नाटक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होत़ी नाट्या स्पर्धेत ‘माझा कुणा म्हणू मी’ (श्री आगवे ग्रामस्थ मंडळ), गेला माधव कुणीकडे (क़ै प्रभाकर भोळे स्मृति कलामंच काळबादेवी), छंद हा प्रियेचा (पावणाई देवी कला उत्कर्ष मंडळ देवूड), चांदणे शिंपित जा (आदित्यनाथ व्याडेश्वर ब्रम्हवृंद नाट्यामंडळ, गणेशगुळे) व रायगडाला जेव्हा जाग येते (श्री देव गांगेश्वर नाट्या समाज) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आल़े
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम क्रमांक प्रशांत घवाळी (एक्सपायरी डेट), द्वितीय क्रमांक दशरथ कीर (मी तर बुवा अर्धा शहाणा), तृतीय क्रमांक गजानन जोशी (मोऊची मावशी), सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम क्रमांक आदित्य बापट (मोऊची मावशी), द्वितीय क्रमांक गौरव फडके (चांदणे शिंपित जा), तृतीय क्रमांक कैलास दामले (रायगडाला जेव्हा जाग येते), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक रक्षिता पालव (चांदणे शिंपित जा), द्वितीय क्रमांक ज्योती निमसे (छंद हा प्रियेचा), तृतिय क्रमांक अमिषा देसाई (माझा कुणा म्हणू मी) यांना देण्यात आल़ा
तसेच सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका प्रथम क्रमांक सुभाष शिवलकर (गेला माधव कुणीकडे), द्वितीय क्रमांक दीपक घवाळी (एक्सपायरी डेट), तृतीय क्रमांक प्रसन्न जोशी (मोऊची मावशी), सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम क्रमांक प्रज्ञा जोशी (काहीतरी वेगळं), द्वितीय क्रमांक सचिन फुटक (मधुर मिलन), सर्वोत्कृष्ट तांत्रिक अंग प्रथम क्रमांक श्री देव गांगेश्वर नाट्यासमाज कोळंबे (रायगडाला जेव्हा जाग येते), द्वितीय क्रमांक अक्षय थिएटर्स (श्री स्वामी समर्थ हम गया नही जिंदा है), तृतीय क्रमांक श्री खंडाळेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ खंडाळा (मोऊची मावशी) यांना देण्यात आल़े
अभिनयाची गुणपत्ता प्रमाणपत्रे पुढील कलाकारांना देण्यात आल़ी सावली मयेकर (आमच्यासारखे आम्हीच), दशरथ रांगणकर (डॅडी आय लव्ह यु), प्रथमेश भाटकर (एक अकल्पीत वाडा), शौनक जोशी (मोऊची मावशी), रोशन धनावडे (काहीतरी घडतय इथे), आर्या शेट्यो (दुनिया चंदेरी), प्रसाद घाणेकर (चुक तुझी का माझी), पूजा सावंत जोशी (चौकटीतले राज्य), कौशल मोरे (इथच संपली नाती), रमा सोहोनी (बेईमान), समिक्षा सावंतदेसाई (गोष्ट जन्मांतरीची), गणेश गांगण (नाका नको माका), शिवानी जोशी (कुमारी सौभाग्यवती), जयप्रकाश पाखरे (प्रिय आईस), उदयराज भाटकर (श्री स्वामी समर्थ हम गया नही जिंदा है), विनोद शिर्के (लग्नाआधी वरात), अर्जून धाकू माचिवले (दुभंगला हा गाभारा), सौरभ जाधव (कुमारी सौभाग्यवती), सुरेखा नाखरेकर (रामची ताई), शशिकांत खापरे (उंबरठ्यावरती माप ठेवीले) आदींना देण्यात आल़े
- रत्नागिरीतील नाट्य स्पर्धेने नवा विक्रम प्रस्थापित झाला: उदय सामंत
उदय सामंत यांनी सांगितले की, देशात सर्वात जास्त काळ चालणारी स्पर्धा कोणती असेल तर ती म्हणजे नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति नाट्या स्पर्धा 182 दिवस सुरू राहिली. वर्ल्डकप किंवा आयपीएलही एवढे चालत नाहीत. रत्नागिरीकरांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि नाटकावरील प्रेम यामुळे नाट्याक्षेत्रातला एक नवा विक्रम प्रस्थापित झाल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितल़े








