धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या नागांव येथे नुक्कड नाटकात भगवान शिव यांची भूमिका साकारणाऱया व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात तो देवाच्या वेशात धूम्रपान करताना दिसून आला होता.
भगवान शिव यांच्या वेशात धूम्रपान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला आता न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या घटनेत सामील अन्य 2 जणांना अद्याप अटक झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
वादग्रस्त चित्रपट निर्माती लीना मणिमेकलई यांनी भगवान शिव आणि पार्वती मातेच्या वेशातील कलाकार धूम्रपान करत असल्याचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले होते. लीना यांच्या ट्विटप्रकरणी लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला होता.









