विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांची बेळगावला भेट
बेळगाव : सीमाभागात युवासेनेची ताकद निर्माण करण्यासाठी युवासेनेचे सीमाभाग विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांनी सोमवारी बेळगावला भेट देऊन आढावा बैठक घेतली. नुकतीच त्यांची बेळगाव, कोल्हापूर विस्तारकपदी निवड झाली होती. रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीला बेळगावसह निपाणी, खानापूर, चिकोडी येथील युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने व्यापक बैठक घेण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघात युवासेनेचे काम सुरू आहे. बेळगावसह निपाणी येथे मागील आठ ते नऊ वर्षांपासून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सामाजिक उपक्रम व युवकांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले आहे. सीमाभागातील सध्याची परिस्थिती तसेच युवकांना येणाऱ्या अडचणी याबाबत डॉ. सतीश नरसिंग यांनी मार्गदर्शन केले. लवकरच युवासेनेचा विस्तार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सतीश नरसिंग यांचा जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, युवानेते शुभम शेळके, दिलीप बैलूरकर, सूरज कणबरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेनेचे विनायक हुलजी, ऋषिकेश सौंदलगेकर, सोमनाथ सावंत, मयंक पावशे, वैभव कामत, अद्वैत पाटील, उमेश पाटील, श्वेत तवनशेट्टी, ओमकार बैलूरकर यासह पदाधिकारी उपस्थित होते.









