वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने ‘उदयपूर फाईल्स’ या चित्रपटाया प्रदर्शनाला अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याला संबंधित कायद्याच्या कलम 6 अंतर्गत केंद्र सरकारकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. ‘कलम 6’ अंतर्गत केंद्राला चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा अधिकार मिळतो. त्यानुसार न्यायालयाने संबंधिताला अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देतानाच अर्ज सादर झाल्यास एका आठवड्यात त्यावर निर्णय घेण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. दिल्ली उच्च न्यायालयाने कायद्याच्या ‘कलम 6’चा हवाला देऊन याचिकाकर्त्याला येत्या सोमवारपर्यंत केंद्र सरकारकडे जाण्याची परवानगी दिली आहे.









