सावली पाटकर मित्र मंडळाच्यावतीने येथील समाज मंदिर जवळील सभागृहात प्रदर्शन
सावंतवाडी / प्रतिनिधी
Exhibition of rare photographs of Babasaheb in Sawantwadi on the occasion of Dr. Ambedkar Jayanti!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सावली पाटकर मित्र मंडळाच्यावतीने येथील समाज मंदिर जवळील सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले . प्रदर्शनाचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर रमेश कुणकेकर ,माजी नगरसेवक तानाजी वाडकर ,एडवोकेट अनिल निरवडेकर ,सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष देवा टेमकर, सावली पाटकर ,सचिन पाटकर, नारायण आरोंदेकर आर.जी. चौकेकर देविदास आडारकर ,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सुरेश भोगटे पालिका लिपिक आसावरी शिरोडकर आदी उपस्थित होत्या. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला समतेचा ,बंधुभावाचा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. त्यांनी शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला .या संदेशानुसार आपण मार्गक्रमण केले पाहिजे .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला घटना दिली .या घटनेनुसार राज्यकारभार चालतो त्यामुळे आज भारताच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी असलेल्या द्रौपदी मुर्म विराजमान होऊ शकल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची ही ताकद आहे .या संविधानाची जपणूक आपण केली पाहिजे. संविधान बदलण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला विरोध केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दबलेल्या समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे या समाजातील मोठ्या झालेल्या व्यक्तीनी आपल्या समाजातील अन्य व्यक्तीनाही पुढे नेण्याचे काम केले पाहिजे .हे काम केल्यास खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण पुढे नेतो असे म्हणावे लागेल .तानाजी वाडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. आज देशातील 140 कोटी जनता खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी आहे .आज संविधान बदलण्याचा काही जण प्रयत्न करीत आहे. तो हाणून पडला पाहिजे .आज समाजाला दैववादी बनवले जात आहे ही घातक बाब आहे .समाजाला विज्ञानवादी बनवले पाहिजे असे वाडकर म्हणाले. जयंत जावडेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून त्यांच्या विचारानुसार मार्गक्रमण केले पाहिजे. त्यांच्या विचारांमध्ये समाजाला पुढे नेण्याची ताकद आहे .त्यातूनच समाजाची प्रगती होईल असे स्पष्ट केले.
बबन साळगावकर यांनी देशात सद्यस्थितीत जे चालले आहे ते योग्य नाही संविधान आणि लोकशाहीच्या दृष्टीने ही मारक गोष्ट आहे. त्यामुळे आता संघटित होऊन संविधान विरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला पाहिजे असे मत व्यक्त केले .सावली पाटकर यांनी आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट समोर आला आहे असे मत वक्त्यांनी व्यक्त केले









