बेळगावकरांचा अतिशय उत्तम प्रतिसाद : प्रदर्शन 26 पर्यंत सर्वांसाठी खुले : लाभ घेण्याचे ग्राहकांना आवाहन
बेळगाव : बेंगळूर येथील सी. क्रिष्णय्या चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्स यांच्यावतीने बेळगावच्या ‘हॉटेल युके 27-द फर्न’ येथे सोन्यांच्या दागिन्यांचे व चांदीच्या वस्तूंचे कलात्मक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी आमदार असिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन केल्यानंतर असिफ सेठ म्हणाले, बेळगावचे ग्राहक चोखंदळ आहेत. या शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे आता बेळगाव विकासाच्या मार्गावर असून येथे अनेक कंपन्या आपल्या शोरुम्स उघडत आहेत. चेट्टी ग्रुपने भरविलेल्या या प्रदर्शनामध्ये वैविध्यपूर्ण असे दागिने असून बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा. चेट्टी ग्रुप ज्वेलर्समध्ये दागिन्यांचा अतिशय उत्तम असा संग्रह असून, कलात्मक डिझाईन्ससह नीलमणी, मोती, माणिक यासह अनेक दुर्मीळ रत्ने आणि हिरे यांचा वापर करून दागिने बनविण्यात आले आहेत. क्लासिक कलेक्शन्स हा एक खास विभाग असून समकालीन सौंदर्य शास्त्राचा प्रभाव या दागिन्यांवर आहे. काही वैशिष्ट्यापूर्ण नेकलेसमध्ये म्हैसूर राजवाड्याच्या स्थापत्य कलेचा कलात्मकरित्या वापर करून घेतला असून, हे ‘दरबार कलेक्शन्स’ पाहण्याजोगे आहेत, असेही ते म्हणाले. मुख्य म्हणजे हे दागिने गुणवत्तापूर्ण आहेत. त्यावर हॉलमार्कचा शिक्का आहे. नवता आणि परंपरा यांचा समावेश या दागिन्यांमध्ये आहे.
बेळगावमध्ये दरवर्षी दोनवेळा प्रदर्शन
विविध नमुन्यांचे मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या, नेकलेस, हार, बाजूबंद, वाकी, कंबरपट्टा यासह अनेक दागिने येथे उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे फॅशन सिल्व्हर ज्वेलरी ब्रँडची संकल्पना सहाव्या पिढीतील चैतन्य कोथा यांची आहे. बेंगळूरमध्ये चेट्टी ग्रुपच्या पाच शोरुम्स असून बेळगावमध्ये दरवर्षी दोनवेळा हे प्रदर्शन आम्ही भरवतो. बेळगावकरांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद आम्हाला लाभला असल्याचे मार्केटिंग प्रमुख तेजस कालरा यांनी सांगितले.
सवलतींचा वर्षाव
प्रदर्शनातील चांदीच्या दागिन्यांवर 2 टक्के, सोन्याच्या दागिन्यांवर 4 टक्के, हिऱ्याच्या दागिन्यांवर 6 टक्के व 18.69 लाखाच्या वरील हिऱ्यावर 9 टक्के सवलत दिली जाईल, असे असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर निशांत यांनी सांगितले. प्रदर्शन दि. 26 पर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 8 पर्यंत सर्वांना खुला आहे.









