बेळगाव : खडेबाजार येथील चंदूकाका सराफ ज्युवेल्स यांच्यावतीने युके-27 द फर्न हॉटेल येथे सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे लक्षवेधी असे प्रदर्शन भरले आहे. अप्रतिम अशी कारागिरी केलेले दर्जेदार दागिने या प्रदर्शनात पहायला मिळतात. यामध्ये अंगठी, मंगळसूत्र, तनमणी, चोकर, कुंदनवर्कचे दागिने, कर्णफुले, बांगड्या यासह अनेक दागिन्यांचा समावेश आहे. चंदूकाका ज्युवेल्सने परंपरा आणि नवता यांचा समन्वय साधणारे दागिने तयार केले असून कुंदन दागिन्यांवर घडणावळीवर 15 टक्के तर हिऱ्यांच्या दागिन्यावर घडणावळीवर शंभर टक्के सूट देण्यात येत आहे.
याशिवाय चंदूकाका ज्युवेल्समध्ये गोल्डन रिंग प्लॅन, गोल्डन इरा यासह वेगवेगळ्या योजना सुरू आहेत. गोल्ड ग्रीम प्लॅनमध्ये बारा महिने किमान 2 हजार रुपये व त्यापुढे रक्कम भरल्यास कोणत्याही दागिन्यांच्या खरेदीवर करणावळीचा दर पूर्णत: माफ आहे. गोल्डन एरा स्कीममध्ये 10 महिने किमान 3 हजार रुपये प्रत्येक महिन्यास भरल्यास प्रत्येक योजनेच्या हप्त्यावर सोने बुक केले जाईल व सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50 टक्के सवलत मिळेल. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर एका हप्त्याची रक्कम सवलत म्हणून देण्यात येईल.
चंदूकाका ज्युवेल्समध्ये प्रत्येक दागिना हॉलमार्क व एचयुआयडी प्रमाणित आहे. सोन्या-चांदीची शुद्धता तपासण्यासाठी कॅरोटो मीटर आहे. जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर शून्य टक्के घट असेल. मोडीची रक्कम थेट ग्राहकाच्या बँक खात्यावर त्वरित जमा करण्यात येईल. या ठिकाणी नोंदणीकृत हिरे आणि राशीरत्नसुद्धा उपलब्ध आहेत, अशी माहिती शाखा व्यवस्थापक शोएब सौदागर यांनी दिली. सदर प्रदर्शन दि. 10 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.









