प्रतिनिधी/ बेळगाव
अक्षरग्रंथ पुस्तकाचे प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी वाङ्मय चर्चा मंडळाच्या सभागृहात झाले. सुभाष सुंठणकर व प्रा. अनिल पाटणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अक्षरग्रंथाचे सदस्य चित्रसेन गोलतकर यांनी पाहुण्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
यावेळी बोलाताना सुभाष सुंठणकर म्हणाले, मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. गावोगावी पुस्तक दुकाने बंद होत असल्याची खंतदेखील व्यक्त केली. यावेळी प्रा. अनिल पाटणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रदर्शन महिनाभर चालणार आहे.