प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा मंडळ इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ‘जुगाड’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ‘ब्र्रेनट्रेन’ या छंद जोपासणाऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या.
उद्योजक डॉ. प्रकाश मुगळी व उद्योजिका चेतना सारंग यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विभागप्रमुख प्रा. वैभव काकडे यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. या प्रदर्शनात एकूण 22 प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. कार चालविताना ड्रायव्हरला झोप लागल्यास अलार्म वाजण्याची यंत्रणा यासह विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यात आले होते. चेतना सारंग यांनी कॉलेजचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांनी आपल्यातील जिज्ञासा जोपासण्याचे सांगितले. डॉ. मुगळी यांनी प्रकल्पांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. बी. जी. कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन प्रा. शुभा भरवानी यांनी केले









