नगराध्यक्षा जस्मिन ब्रागांझा यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत पालिका इमारतीमध्ये भरवण्यात आलेल्या ऑरा फाइन ज्वेलरीच्या प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन नगराध्यक्षा जस्मिन ब्रागांझा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मोठया उत्साहात झाले. यावेळी स्टोअर मॅनेजर पराग रेवणकर, डॉ. शेटगावकर, मुख्याधिकारी मनोहर कारेकर, अन्य नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.
ऑरा फाइन ज्वेलरीने भरवलेल्या या प्रदर्शनात दागिन्यांचा उत्कृष्ट संग्रह मांडण्यात आला असून सदर दागिने पारंपरिक आणि संस्कृतीशी निगडीत कारागिरांनी सुंदरपणे तयार केलेले आहेत. तसेच त्यांचे सर्व डिझाईन हाताने तयार केलेले आहेत. अशा या दागिन्यांच्या प्रदर्शन तथा विक्रीचा कुडचडे, सांगे, सावर्डे येथील लोकांना फायदा घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा ब्रागांझा यांनी यावेळी केले. सदर विक्रीस ठेवलेल्या वैशिष्टय़पूर्ण डिझाइन्सच्या दागिन्यांवर 25 टक्के सूट असून शून्य व्याजदराने हप्त्यांवर ते विकत घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती व्यवस्थापक रेवणकर यांनी दिली.









