विशाखापट्टणम येथे पोहोचल्या दोन युद्धनौका
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाच्या दोन युद्धनौका एचएमएएस ऍडलेड आणि अंजॅक या सोमवारी सकाळी विशाखापट्टणम येथे पोहोचल्या आहेत. भारत अन् ऑस्ट्रेलियाच्या नौदलादरम्यान येथे इंडो-पॅसिफिक एंडेव्हर युद्धाभ्यास होणार आहे. या युद्धाभ्यासामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत होणार आहेत. पाणबुडीविरोधी युद्धाभ्यास, युद्धनौकाविरोधी युद्धाभ्यासात भाग घेतल्याने दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्पर संपर्क वाढणार असल्याचे भारतीय नौदलाच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.

यापूर्वी रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाकडून आयोजित करण्यात आलेल्या युद्धाभ्यासात आयएनएस सातपुडा आणि पी-8आय सागरी गस्त विमानाने भाग घेतला होता. रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल हे प्रशांत महासागरीय क्षेत्रातील सर्वात मोठय़ा सागरी शक्तींपैकी एक आहे.








