कडेगाव, प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथिल रहीवाशी व सध्या दिल्ली येथे बीएसएनएल मधील वरिष्ठ अधिकारी महादेव अडसुळ यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी संघटनेने देशपातळीवर निवडणुकीत बाजी मारली ५२ टक्के मते मिळवत शासनाची व बीएसएनएलची मान्यता मिळवली. गेल्याच आठवड्यात ही देशपातळीवरील निवडणुक झाली. एकुण नऊ विविध संघटना निवडणुकीच्या रिंगणात होत्या. सर्वाधिक मते मिळणारी संघटना अधिकृत ठरणार होती.
या निवडणुकीत प्रथम श्रेणीच्या व द्वितीय श्रेणीच्या एकुण ३० हजार अधिकाऱ्यांनी मतदान केले. त्यामध्ये संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन ( एस एन ई ए) या संघटनेने ५२ टक्याहुन अधिक मते मिळवली. ही संघटना पुढील तीन वर्ष अधिकाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडेल या संघटनेचे नेतृत्व सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील महादेव अडसुळ यांचेकडे असल्यामुळे दिल्लीत सांगली जिल्ह्याचे व कडेगांव चे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. या यशाबद्दल सांगली जिल्ह्यातील व कडेगांव तालुक्यातील जनतेकडून व मित्रमंडळी कडून महादेव अडसुळ यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महादेव आडसूळ माळी यांनी आपल्या प्रतिकुल परीस्थितीत शिक्षण घेवून झेप घेतली आहे. यामुळे कडेगांव शहराच्या नावलौकिक वाढला आहे.कडेगांव नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या,मा.उप नगराध्यक्ष विजयसिंह गायकवाड,प्रकाश नलवडे, सभापती अमोल डांगे, सभापती निलेश लंगडे, विजयसिंह खाडे,सागर सुर्यवंशी, विठ्ठल खाडे, आनंदराव रास्कर,डि.एस.देशमुख, अभिजित लोखंडे, पत्रकार यांचे वतीने अभिनंदन केले.