मालवण वायरी येथील घटना
मालवण / प्रतिनिधी
एकादशी दिवशी मालवण वायरी आर. जी. चव्हाण हॉल जवळ राहणारे संजय करलकर यांनी बाजारातून आणलेल्या फणसाच्या गऱ्याला चक्क मोदकाचा आकार दिसून आला. यामुळे कुतुहलाचा विषय बनला होता. सदरचा मोदकाचा गरा अनेकांनी पाहिला आणि निसर्गाच्या अद्भूत घटनांचा आनंद घेतला.









