संग्राम काटकर,कोल्हापूर
Ambabai Temple Kolhapur : गेल्या काही वर्षांमध्ये प्रतिवर्षी देशभरातील एक कोटीहून अधिक भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेबरोबरच भाविकांच्या सुरक्षेलाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्राधान्य देत मंदिरात डिजिटल सुरक्षा सिस्टीम कार्यान्वित केली.या सुरक्षेमुळेच मंदिराच्या चारी दरवाजातून एकही व्यक्ती घातक शस्त्र,विस्फोटक आतमध्ये आणू शकत नाही.यदाकदाचित पोलिसी नजर चुकवून कोणी शस्त्र,विस्फोटक मंदिरात नेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा मनसुभा मंदिराबाहेरच उघडा पाडेल,अशी ही डिजीटल सुरक्षा आहे.याच सिस्टीमच्या आधारे मंदिर व आवारातील चोऱ्याही काहीच तासात उघड करुन चोरांना पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.
या सगळ्याची डिजीटल सुरक्षा सिस्टीमची मुंबईतील प्रामा हिकव्हिजन कंपनीने दिवाळीपूर्वी पाहणी केली. यामध्ये मंदिर व आवारातील कॅमेरे, चारही दरवाजांवरील डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील अद्ययावतही गंभीरपणे तपासला. त्यासंदर्भातील अहवाल दिल्लीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयएफएसईसी कमिटीकडे पाठवला. या कमिटीनेही पाहणी अहवालाला गांभिर्याने घेऊन एक्सलन्स इन सिक्युटीरी ऍवॉर्ड जाहीर केला. हा पुरस्कार नुकताच दिल्लीतील प्रगती मैदानावर झालेल्या कार्यक्रमात देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे, उपअभियंता सुयश पाटील व सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप यांनी स्वीकारला. मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्कार स्वरुप आहे.
हेही वाचा- कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर लोकसभेत सुप्रिया सुळे आणि विनायक राऊतांचा हल्लाबोल
गेल्या 20 ते 25 वर्षांपासून देशातील विविध धार्मिक स्थळ व परिसरात दहशतवादी कारवाया होत आहे. अंबाबाई मंदिर व परिसरातही अशी घटना घडू शकते, अशीही भीती व्यक्त होत होती. त्यामुळे आयबी आणि पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश 2005 साली देवस्थान समितीला दिले होते. समितीनेही मंदिराच्या चारही दरवाजांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षही मंदिरात उभारला. पुढील काळात गरजेप्रमाणे कॅमेरेला वाढवले. 2012 साली तर मंदिरात घातक शस्त्र,विस्फोटक येण्यावाचून रोखण्यासाठी मंदिराच्या चारही दरवाजांवर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवले.त्यामुळे मंदिरात घातक वस्तू घेऊन जाण्याचे कोणाचे धाडस झाले नाही.कालांतराने कॅमेऱ्य़ांची संख्या वाढून सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष अधिक अद्ययावत केला.त्यामुळे मंदिरासह साऱ्या परिसरातील प्रत्येक भागावर स्वतंत्र वॉच राहिला.
केंद्र सरकारने 2016 साली अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी आता डिजीटल यंत्रणा कार्यान्वित करावी,असे आदेश देवस्थान समितीला दिले.या आदेशानुसार समितीनेही डिजिटल सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली.सोबत टप्प्या-टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली.त्यामुळेच आजमितीला मंदिर व आवारावर तब्बल 85 कमॅऱ्यांचा वॉच आहे.हे सर्व कॅमेरे 360 डीग्रीमध्ये फिरुन परिसराचे चित्रण करतात.नुकत्याच झालेल्या नवरात्रौत्सवात तर अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाजांवरील मुळचे डिटेक्टर काढून त्याजागी अत्याधुनिक मल्टी झोन डोअर प्रेम मेटल डिटेक्टर डिटेक्टर बसवले.आरबीएल बँकेची ताराबाई पार्क शाखा व स्टेट बँकेने हे डिटेक्टर दिले आहेत.या डिटेक्टरमधील अल्ट्राझोन यंत्रणा प्रत्येक भाविकाच्या शरिरातील 18 भागांची तपासणी करुन त्यांच्या शरिराचे तापमानही मोजते.शिवाय प्रतिसेकंद भाविकांचे फोटोही काढते.कोट्यावधीच्या घरात फोटो सेव्ह राहतील,अशी या अद्ययावत डिटेक्टरमध्ये आहे.ही सगळी डिजीटल सुरक्षा सिस्टीमवर प्रभावित होऊन आयएफएसईसी कमिटीने एक्सलन्स इन सिक्युटीरी ऍवॉर्डसाठी निवड करुन देवस्थान समितीचा गौरव केला.
देवस्थान समितीने अंबाबाई मंदिराच्या परिसरावर वॉच ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था केली आहे. या ड्रोनसह मंदिर व आवारातील डिजीटल सुरक्षा प्रणालीची कशी सुसज्ज ठेवायची याचे प्रशिक्षण सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप यांना दिले आहे.त्यासाठी त्यांना मुंबईला पाठवले. भविष्यातही पोलीस प्रशासन व आयबीकडून सुरक्षेच्या दृष्टीने जे आदेश मिळतील,त्याप्रमाणे डिजीटल सुरक्षा व्यवस्था केली जाईल. त्यासाठी विशेष निधी देवस्थान समितीकडून बाजूला काढू ठेवला जाईल.
शिवराज नाईकवाडे (देवस्थान समिती)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









