शहरातील विविध भागातील प्रकार : रस्त्यांच्या डांबरीकरणानंतर काही तासातच ख•s खोदण्याचे प्रकार, महापालिकेचे दुर्लक्ष

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कित्येक वर्षानंतर रस्त्यांचे भाग्य उजळले असून विविध रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र डांबरीकरण झालेल्या काही तासातच पुन्हा खोदाई करण्याचे सत्र सुरू आहे. ख•ा खोदण्यात आल्याने पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी अवस्था शहरातील रस्त्यांची होत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरांतर्गत रस्त्याचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यांचा विकास झाला नव्हता. बाजारपेठेतील, प्रत्येक गल्लीतील रस्त्यावर चरी, ख•s निर्माण झाले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र केवळ पॅचवर्क करून वेळ मारून नेण्याचा प्रकार महापालिकेने केला होता. मात्र अलिकडेच शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. पण हे कामदेखील केवळ दिखावूपणाचे असल्याचे निदर्शनास येत आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्यापूर्वी चरी आणि ख•s व्यवस्थित बुजवून घेणे आवश्यक आहे. मात्र चरी आणि ख•s बुजविण्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे घातलेले डांबर काही दिवसानंतर चरी आणि ख•dयांमध्ये बसत असल्याने डांबरीकरण केलेला रस्ता पुन्हा खचत आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच कंत्राटदाराकडून केवळ दिखावूपणाचे कामकाज सुरू असल्याची टीका नागरिक करीत आहेत.
शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण केलेल्या काही दिवसातच तर काही ठिकाणी तासाभरातच रस्त्यावर ख•s खोदण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील बहुतांश भागात विविध कंपन्यांच्या मोबाईल वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. खडक गल्ली परिसरात रस्त्याचे डांबरीकरण केलेल्या दुसऱ्याच दिवशी केबल घालण्यासाठी मशीनद्वारे ख•ा खोदण्यात आला. तसेच केबल घालण्यासाठी आणलेल्या यंत्रोपकरणामुळे रस्त्यावर ख•ा निर्माण झाला. अशाप्रकारे डांबरीकरण झालेला रस्ता खराब झाल्याने येथील रहिवाशांनी याबाबत हरकत घेतली व दुसरीकडे ख•ा खोदण्यास आक्षेप घेऊन काम बंद करण्याची मागणी केली. रस्त्याचे डांबरीकरण वेळेत होत नाही, अशातच रस्ता केलेल्या दुसऱ्याच दिवशी खोदाई केली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील विविध भागात मोबाईल केबल घालण्याचे काम सुरू असून नव्याने केलेल्या रस्त्याची खोदाई केल्याने दुरवस्था होत आहे. त्यामुळे प्रथम मोबाईल केबल, नळजोडण्या, ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण करावे. त्यानंतरच डांबरीकरण करावे. तसेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खोदाई करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.









