विजय कापडी यांचे मत
पणजी : मराठी साहित्यात विनोदी साहित्य यायला 1902 साल उजाडावे लागले.1909 साली सुदाम्याचे पोहे हे पहिले विनोदी पुस्तक प्रकाशित झाले. अतिशयोक्ती हे विनोदाचे महत्वाचे अंग आहे. श्रीकृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी व आचार्य अत्रे यांचा विनोद काहीसा हिंस्त्र आहे असे मत प्रसिद्ध विनोदी लेखक विजय कापडी यांनी येथे व्यक्त केले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या शशिकांत नार्वेकर व्याख्यानमालेत ’विनोदी साहित्यातील गमती जमती’
या विषयावर पाहिले पुष्प गुंफताना विजय कापडी बोलत होते .चि वि जोशी यांचा परिहास्याचा विनोद,पु.ल. देशपांडे यांच्या लेखनातील हजरजबाबीपणा व कोट्या,गंगाधर गाडगीळ यांनी विनोदी लेखनात बंडू, स्नेहलता आणि नानू ही रंगवलेली पात्रे, बाळ गाडगीळ यांनी जुन्या नव्या नाटकांचे केलेले विडंबन, याच बरोबर कापडी यांनी द मा मिरासदार, वि आ बुवा, वसंत सबनीस, जयवंत दळवी,राम नगरकर,सोपान देव चौधरी, तसेंच गोमंतकीय लेखक वि का प्रियोळकर ,पुष्पाग्रज,लक्ष्मण पित्रे,विद्या नाडकर्णी, संदीप मणेरीकर यांच्या विनोदी लेखनातील गमती सांगितल्या. मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी स्वागत केले व शशिकांत नार्वेकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प शुक्रवारी फोंडा येथे गुंफण्राया लेखिका डॉ. अनिता तिळवे यांच्या हस्ते व्याख्यान मालेचे उदघाटन करण्यात आले. कोषाध्यक्ष राजमोहन शेट्यो यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले. मुंबईला असतांना नवशक्ती मध्ये रविवारच्या पुरवणीत दर्जेदार नाट्यापरीक्षणे लिहिणारे शशिकांत नार्वेकर यांची ते 1989 मध्ये गोव्यात आले व मीही त्याच दरम्यान गोव्यात आलो तेव्हा ओळख झाली. गोमंतक मराठी अकादमीचे नार्वेकर व प्राचार्य मयेकर हे अध्यक्ष कायम लक्षात राहिले.









