कराड / सुभाष देशमुखे :
काम सुरू आहे. एक महिला रस्ता ओलांडताना अवजड वाहनाच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाली. अपघातात तिचा पाय कायमस्वरूपी निकामी झाला. हा दुर्देवी प्रसंग केवळ एका कुटुंबावर आघात करतो असं नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या नियोजनशून्यतेवर प्रश्नचिन्ह उभं करतो. उड्डाणपुलाखालून जाणारा नवा रस्ता…. त्यावरून सुसाट वेगात धावणारी वाहने आणि रस्त्याकडेच्या सिमेंटच्या ब्लॉक्समध्ये उरलेली थोडीशी पादचारी मार्गाची जागा… हे वित्र गंभीर आहे. ही केवळ असुविधेचं नाही, तर थेट जिवावर बेतणारं आहे. पादभायऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग नाही, वाहनचालकांसाठी वेगावर नियंत्रण नाही आणि कोणतीही तात्पुरती यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नाही.
कराड शहरालगत मलकापूर फाट्यावर उड्डाणपुलाचे मलकापूर शहर है महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस विभागले गेले आहे. साहजिकच पश्चिम बाजूकडील पादचाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना पूर्व बाजूकडे जायचे असेल, तर सध्या अत्यंत पोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागतो. कोल्हापूरकडे जाणारा सेवारस्ता… नव्या उड्डाणपुलाखालून जाणारा नवा रस्ता… पुणे बाजूकडे जाणारा सेवारस्ता या तीन रसयांवरून धावणाऱ्या वाहनांना चकवा देत इकडून तिकडे जावे लागते. त्या परिसरात लावलेला ‘भांगा, पाहा आणि जा’ असा फलक वस्तुस्थितीत काहीच बदल घडवत नाही. कारण वाहनांचा वेग इतका प्रचंड असतो, की पादनाऱ्यांनी कितीही सावधगिरी बाळगली तरीही अपघाताची भीती कायम असते.
रस्ता नवीन, सरळसोट आणि रुंद असल्याने वाहनमालकांनी वेग मर्यादा पाळावी, अशी अपेक्षा करणेच फोल आहे. यातच जीवन-मरणाच्या दारातून प्रत्येक सेकंदाला पादचारी, लहान मुले, वयोवृद्ध वाट काढत असतात.
- जबाबदार कोण?
प्रश्न उभा राहतो, की या परिस्थितीत नेमकी चूक कोणाची? प्रशासनाची म्हणता येईल का? कारण रस्त्याने काम सुरू असताना पादचाऱ्यांसाठी तात्पुरते पण सुरक्षित पर्याय नाहीत ठेकेदाराची म्हणता येईल का? कारण उड्डाणपुलाचे काम चालू असताना रस्त्याकडेला संरक्षक कठडे म्हणून लावलेल्या सिमेंटच्या ब्लॉकमध्ये अंतर ठेवून वाट काढून तिथे कर्मचारी नाहीत. की नागरिकांचीव? कारण अपुरी सुविधा असतानाही पोकादायक मागनि रस्ता ओलांडण्यानी वेळ नागरिकांवरन येते.
- व्यवस्थेतील दिरंगाई अन् असंवेदनशीलतचे दर्शन
नुकत्याच झालेल्या अपचाताने केवळ एका महिलेगा पाय गेला नाही, तर संपूर्ण व्यवस्थेतील दिरंगाई आणि असंवेदनशीलतेने दर्शन घडवले आहे. हा केवळ अपघात नव्हे, तर भविष्यातील अनेक दुर्घटनांची नांदी ठरू शकतो.
मलकापूर फाट्यावर पादचारी नेहमीच रस्ता ओलांडत असतात. महामार्गाच्या दोन्ही बाजूला रहिवासी वस्ती, रुग्णालये, शाळा, बँका असल्याने पादनायऱ्यांना रस्ता ओलांडणे माग पडते. शाळा सुटल्यावर इथली परिस्थिती अत्यंत भीतीदायक असते. त्यामुळे मलकापूर फाट्यावर तत्काळ उपाययोजना राबवण्याची गरज आहे.
-धनंजय येडगे, उद्योजक, मलकापूर
- काय करायला हवे…
पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार करणे
तो करत असताना तिथे कर्मचारी नेमणे जसे कोल्हापूर नाक्यावर आहेत
वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रम्बलर बसवणे
जनजागृतीसाठी प्रभावी फलक व कार्यक्षम सूचना पद्धती राबवणे
यासह अनेक ज्या ज्या शक्य आहेत. त्या उपाययोजना पादचाऱ्यांचे अपघात रोखण्यासाठी करणे गरजेचे आहे








