Coal Scam Case : राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांनाही चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सीबीआयच्या विशेष कोर्टाने लोकमत समुहाचे विजय दर्डा यांच्यासह सात जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होत. देवेंद्र दर्डा यांच्यासह जेएलडी यवतमाळ प्रायव्हेट एनर्जी लिमिटचे डायरेक्टर मनोजकुमार जैस्वाल यांनाही चार वर्षाची शिक्षा. तर इतर सनदी अधिकाऱ्यांना 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
1999 ते 2005 मध्ये जेएलडीचे जुने ब्लॉक अलोट करण्यात आले होते त्य़ाची माहिती लपवून युपीए सरकारमध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळवल्याचा आरोप होता. युपीए सरकारमध्ये घोटाळे गाजले होते. त्याकाळात कोळसा घोटाळा प्रकरण गाजलं होते. त्याच प्रकरणातील ही 13 वी शिक्षा आहे.छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जे पत्र लिहिले त्या पत्रामध्ये माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच आधारावर ही शिक्षा झाली आहे. सीबीआयने या प्रकरणांमध्ये 2012 ला रिपोर्ट दिला होता पण कोर्टाने तो फेटाळला. गेल्या नऊ वर्षांमध्ये आम्ही सातत्याने कोर्टाच्या चकरा मारत आहोत आम्हालाही त्रास झाला आहे असा बचाव दर्डा यांच्यावतीने करण्यात आला होता. यामुळे शिक्षेचा कालावधी कमी करावा असा युक्तीवाद त्यांच्या वतीने मांडण्यात आला. मात्र त्यांच्यावर चिटिंग करण्याचा आरोप असल्यामुळे त्यांना चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.