माजी मंत्री व कित्तूरचे माजी आमदार डी.बी. इनामदार (वय ७४) यांचे आज मंगळवार दि. २५ रोजी निधन झाले. दीर्घकाळापासून फुफ्फुस आणि यकृत समस्यांनी ते त्रस्त होते. त्यांच्यावर बेंगळूरच्या मणिपाल इस्पितळात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले. उद्या बुधवार दि. २६ रोजी दुपारी २ वाजता त्यांचे मुळ गाव नेगिनहाळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. आज पर्यंत ते ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि जनतेतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









