बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बेळगावात भव्य रोड शो केला.
मंगळवारी संध्याकाळी काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ हिंडलगा परिसरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भव्य रोड शो केला. रोड शो च्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फ़ा मोठी गर्दी दिसून आली. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून ग्रामीण भागात केलेल्या विकासाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कौतुक करून आपले समर्थन दिले.
यावेळी भागातील मतदारांची भेट घेऊन यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन मला बहुमताने विजयी करा आणि पुन्हा एकदा मतदारसंघाच्या विकासासाठी संधी द्या असे आवाहन उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.










