रत्नागिरी, प्रतिनिधी
Ratnagirir News : रत्नागिरीच्या माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्वप्नाली सावंत या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्या संबंधी पती सुकांत सावंत यांनी शहर पोलिसांत तकार दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी सुकांत सावंत यांच्या स्वप्नाली सावंत या दुसऱ्या पत्नी आहेत. स्वप्नाली यांनी रत्नागिरी पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवले आहे. मागील काही वर्षापासून स्वप्नाली यांचे कौटुंबिक वाद होत असल्याचे समोर आले होते. त्या संबंधी स्वप्नाली यांच्याकडून रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान गुरूवारी सायकांळी या संबंधी पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
यासंबंधी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हे विविध ठिकाणी कसून तपास करत आहेत. अद्याप पोलिसांकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही. स्वप्नाली सावंत यांच्यासंबंधात तपास करण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके तयार करण्यात आली असून विविध पद्धतीने तपास करण्यात येत आहे.
लवकरच या प्रकरणाचा उलघडा होणार
स्वप्नाली सावंत यांच्यासंदर्भात पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत. असे असले तरी आताच याविषयी भाष्य करण्यात करणे योग्य नाही. लवकरच या प्रकरणाचा उलघडा होईल. अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









