पंतप्रधान नरेंद्र मोदी : मारुतीच्या पहिल्या ईव्हीला हिरवा कंदील
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरात येथील हंसलपुरमध्ये ई विटारा या मॉडेलला निर्यातीसाठी रवाना केले. पंतप्रधानांनी यावेळी ‘मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. तिची निर्मिती पूर्णपणे भारतात झाली असून ती आता जगभरातील जवळपास 100 पेक्षा अधिक देशांना भारतामधून निर्यात केली जाणार असल्याचा’ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
या कारमध्ये 49 केडब्ल्यूएच आणि 61 केडब्ल्यूएच या क्षमतेच्या दोन बॅटरी पॅकचाही पर्याय दिला आहे. कंपनीचा दावा आहे की कार एकावेळी पूर्ण चार्ज केल्यावर ती 500 किलोमीटरपेक्षा अधिक धावणार आहे. इलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन फेब्रुवारी-2025 मध्ये सुझुकी मोटर गुजरात प्राइवेट लिमिटेड येथे करण्यात आले आहे. मारुती ई विटारा मॉडेलची किंमत 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. 61 केडब्लूएच बॅटरी मॉडेलची किंमत 25 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.
मेक इन इंडियाचा नवा अध्याय
?गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारताने मेक इन इंडियात नवीन अध्याय जोडला आहे.
? जपानची सुझुकी कंपनी भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. जी वाहनांची निर्मिती करीत आहे.
? कोणीही गुंतवणूक करु द्या यामध्ये डॉलर किंवा पौंडमध्ये याचा आपल्याला याचे काहीही देणेघेणे नाही.
? सर्व राज्यांनी 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्यासाठी साथ देण्याची घोषणा यावेळी केली आहे.









