गिर्यारोहणाला नवा आयाम देणारा एव्हरेस्ट चढाई मोसम
2025 सालचा एव्हरेस्टचा हंगाम अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. विक्रमी संख्येने शिखर चढाई, दुर्मिळ अन नव्या तंत्रज्ञानाचा वापर, शेर्पा समुदायासमोरील नवे आव्हान, नैतिक व वैज्ञानिक चर्चा, आणि गिर्यारोहणातल्या परंपरागत दृष्टिकोनाला आव्हान देणारे प्रयोग या सर्व घटकांनी मिळून हा हंगाम संस्मरणीय ठरवला. हा मोसम केवळ एव्हरेस्टच नाही तर संपूर्ण गिर्यारोहण क्षेत्राला एका निर्णायक वळणावर घेऊन आला आहे.
नवा प्रयोग: झेनॉन गॅससह वेगवान चढाई
ब्रिटनच्या माजी स्पेशल फोर्सेस कमांडोजनी एव्हरेस्टवर झेनॉन गॅसचा उपयोग करून अल्प वेळात चढाई पूर्ण केली. अवघ्या सात दिवसांत लंडन ते एव्हरेस्ट ते पुन्हा लंडन असा अद्वितीय प्रवास पूर्ण केला. अलिस्टेअर कार्न्स (संसद सदस्य व रॉयल मरीन कर्नल), गार्थ मिलर, केविन गॉडलिंग्टन आणि अँथनी स्टॅझिकर या चौघांनी हा दुर्मिळ प्रयोग केला. मोहिमेपूर्वी तीन महिने त्यांनी हायपॉक्सिक तंबूंमध्ये सराव केला आणि नंतर झेनॉन गॅसचे उपचार घेतले. झेनॉन हा पृथ्वीवरील एक दुर्लभ, रंग-गंधहीन आणि जड गॅस असून, वैद्यकीय उपचारांत आणि अंतराळ रॉकेट्समध्ये त्याचा उपयोग होतो. या गिर्यारोहकांच्या मते, झेनॉनमुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजन शोषणाची क्षमता प्रचंड वाढते. परिणामी, कमी वेळात, कमी थकव्याने आणि अधिक सुरक्षिततेने शिखर गाठणे शक्य होते.
वादग्रस्त यश: डोपिंग की वैज्ञानिक क्रांती?
या प्रयोगामुळे गिर्यारोहण विश्वात तीव्र चर्चा पेटली. काही अनुभवी गिर्यारोहकांच्या आणि तज्ञांच्या मते, हे डोपिंगचं स्वरूप आहे. गिर्यारोहणाचा आत्मा म्हणजे निसर्गाशी जुळवून घेत आगेकूच करणे आणि मानवी मर्यादांचा सन्मान पण अशा वैज्ञानिक सहाय्यामुळे मूळ आव्हानं इथे बाजूला पडतात. त्याचा दीर्घकालीन परिणाम काय असेल? शरीरावर साईड इफेक्ट्स काय असतील? या बाबत अजून अभ्यास गरजेचा आहे. मात्र दुसरीकडे, या पद्धतीने मोहिमा सुरक्षित होत असल्याचा दावा झेनॉन समर्थक करतात. ‘डेथ झोन‘मध्ये कमी वेळ घालवल्यामुळे जीवितधोकाही 95 टक्क्यांपर्यंत कमी होतो, हे त्यांच्या निरीक्षणातून दिसते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वेळेची व पर्यावरणाची मोठी बचत होते.
ड्रोन टेक्नॉलॉजीचा प्रभाव
यंदाच्या हंगामात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग. Aग्rत्ग्tि ऱाज्aत् आणि अघ् या कंपन्यांनी ड्रोनच्या मदतीने बेस कॅम्पपासून कॅम्प 1 पर्यंत ऑक्सिजन सिलिंडर, औषधे, रसद आणि तंबूंचं साहित्य पोहोचवलं. ड्रोन हे अवघ्या 12-15 मिनिटांत ते अंतर पार करतात. याच ड्रोननी 500 किलोपेक्षा अधिक कचरा खाली आणला. त्यामुळे एव्हरेस्टवरील कच्रयाचं प्रमाण कमी झालं, आणि घ्मaित्त् अम्tदे म्हणून काम करणाऱ्या शेर्पा आता अनेक धोकादायक फेऱ्यांपासून वाचले.
रोजगार आणि शेर्पा समुदाय
ड्रोन व झेनॉन उपचार यामुळे गिर्यारोहण अधिक सुरक्षित आणि वेगवान होत असलं, तरी शेर्पा समुदायाच्या पारंपरिक भूमिकेला मर्यादा येऊ लागली आहे. विशेषत? नवख्यांना मदत करणं, सामान वाहून नेणं आणि मार्गदर्शन करणे हे सगळं यंत्रणा घेत असल्यामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेर्पा लोकांना ड्रोन ऑपरेशन, टेक्निकल गाईडिंग, आणि रिस्क मॅनेजमेंट अशा नव्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करणं गरजेचं आहे.
विक्रमांचा हंगाम
या हंगामात नेपाळी शेर्पा ताशी ग्यालजेन याने केवळ 15 दिवसांत चार वेळा एव्हरेस्ट चढाई केली.. त्यांच्या या अफाट पराक्रमामुळे नेपाळमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही, तर गिर्यारोहण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करणारी घटना आहे. त्याच्या जोडीला कामे रिता शेर्पा यांनी 31 व्या वेळेस एव्हरेस्ट चढाई करून आपला ‘सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट चढाई‘चा विक्रम अजून मजबूत केला. 55 वर्षी कामे रिता अथकपणे अजूनही एव्हरेस्ट चढाई करत आहे. त्याचा या उत्साह, जिद्द व चिकाटी वाखाणण्याजोगी आहे.
भविष्यातील दिशा
सर्व घडामोडींमुळे 2025 चा एव्हरेस्ट मोसम हा ‘टर्निंग पॉइंट‘ ठरणार आहे. झेनॉनचा वापर, ड्रोन तंत्रज्ञान, जलद मोहिमा हे सगळं पुढे इतर उंच शिखरांवरही वापरलं जाणार हे निश्चित आहे. यामुळे पर्वतारोहणात ठशरीर विरुद्ध तंत्रज्ञानठ, ठसाहस विरुद्ध सुरक्षितता, आणि ठपरंपरा विरुद्ध प्रयोगठ यामधील संघर्ष अधिक तीव्र होईल. नेपाळ सरकार, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण संस्था आणि पर्यावरण संस्था यांच्यावर ही मोठी जबाबदारी येणार आहे केवळ विक्रमी संख्येवर लक्ष केंद्रित न करता शाश्वत, नैतिक आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देण्राया गिर्यारोहणाला दिशा देणं हेच या मोसमाचं खऱ्या अर्थाने यश ठरेल.
उमेश झिरपे,जेष्ठ गिर्यारोहक, गिरिप्रेमी









