पहिले रेल्वेगेट परिसरात वाहतूक कोंडी
बेळगाव : ऐन गर्दीच्यावेळी एका बाजूचे रेल्वेगेट उघडले नसल्याने वाहतुकीची कोंडी झाली. तळपत्या उन्हात नागरिकांना बराचकाळ रेल्वेगेटवर थांबावे लागले. अखेर गेटमनने हुशारी दाखविल्यानंतर रेल्वेगेट खुले झाले आणि वाहने पुढे सरकली. टिळकवाडी पहिले रेल्वेगेट येथे शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास रेल्वेगेट बंद झाले. रेल्वे गेल्यानंतर गेट उघडण्यात आले. परंतु एकाच बाजूचा गेट उघडल्याने वाहने अडकून पडली. बऱ्याचवेळा प्रयत्न करूनही गेटचा लोखंडी खांब वर जात नसल्याने वाहने अडकून पडली होती. अखेर काहीवेळाने लोखंडी खांब वर झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. परंतु गर्दीच्यावेळी गेट न उघडल्याने बराचवेळ वाहतूक कोंडी झाली.









