सुधाकर काशीद, कोल्हापूर
Kolhapur News : हे सर्जेराव महादेव सोनवणे.कृषी विभागात वरिष्ठ अधिकारी होते.35 वर्ष नोकरी केली.सहा वर्षापुर्वी निवृत झाले.साधारण निवृत झाल्यावर प्रकृतीची कटकट जाणवायला लागते.वार्धक्याची चिंता अधून मधून येऊन भिडू लागते.दिवसभर वेळ कसा काढायचा हे देखील काहींना समजेनासे होते.पण सर्जेराव सोनवणे यांनी या प्रश्नांना अगदी ठरवून दूर ठेवले.एका वेगळ्याच छंदात आपले आयुष्य गुंतवून ठेवले.घरगुती वापराचे कसलेही यंत्र असो ,उपकरण असो ते घरातच स्वत? दुरुस्त करायचे ज्ञान त्यांनी अवगत केले.खास त्यांच्या या आवडीच्या छंदामुळे त्यांना त्यांचा वेळ कसा जातो हे कळत नाही .आणि निवृत्ती हा शब्दही त्यांच्या आसपासफिरकत नाही.
आज सर्जेराव सोनवणे घरातला मिक्सर लिलया दुरुस्त करतात . त्याच लिलयेत स्वत?ची मोटार मोटरसायकल दुरुस्त करतात.रेडिओ रेकॉर्ड प्लेयर तर सोडाच,पण मोबाईल कॉम्प्युटरही दुरुस्त करतात.घरचा किंवा सार्वजनिक ठिकाणचा एखादा नळ गळू लागला तर त्याची गळती थांबवतात.हातातले घड्याळ तर सहजच ,पण जुन्या राजवाड्याच्या घड्याळालाही ठिकाणावर आणतात.आज ते 65 वयाचे आहेत.तब्येतीच्या सर्व त्रासापासून मुक्त आहे त.घरी ते आणि पत्नीच आहेत.पण एवढ्या मोठ्या बंगल्यात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांच्यापासून खूप लांब आहे.या कामात वेळ कसा जातो हे त्यांना कळतही नाही .आणि त्यातून त्यांना जे समाधान मिळते त्याची तर तुलनाच होऊ शकत नाही.
सर्जेराव सोनवणे कृषी खात्यात तांत्रिक विभागात नोकरीस लागले.कोल्हापूर सांगली सातारा या जिह्यात त्यांनी काम केले.मात्र हे काम करताना त्यांनी स्वत?चे छंद जोपासले.रेडिओ खरखरू लागला ,पंखा आखडू लागला ,मिक्सरचे पाते अडकू लागले,घड्याळ बंद पडू लागले ,मोटरसायकल बंद पडू लागली तर ते स्वत: खोलू लागले .त्यांच्या लक्षात आले की ,या सर्व तंत्रज्ञानाला एक दिशा असते.त्या दिशेने त्याचा शोध घेत गेले की नेमक्या दोषाचे ठिकाण कळू शकते.आणि हा दोष दुरुस्त केला की मशीन पुन्हा सुरू होऊ शकते.त्यात अवकाश याना सारखे काही फार किचकट किंवा फार प्रगत असे तंत्रज्ञान नसते.
निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या या छंदाला पूर्ण वेळ दिला.स्वत:च्या मोठ्या बंगल्यात जिन्याखालची जागा या कामासाठी वापरण्यास सुरुवात केली.या कामातून फार पैसा मिळवायचा हा कधी हेतू नव्हताच.कारण पत्नी संध्या नोकरीला.मुले राकेश व विवेक दोघेही इंजिनियर. मुलगी श्वेता अमेरिकेत.वास्तविक अशा वातावरणात ते दिवसभर कोचावर बसून हातात रिमोट घेऊन टीव्ही बघत बसू शकले असते.पण सोनवणे यांनी आपल्या छंदाकडे अधिक लक्ष दिले .छोटे छोटे कसलेही नवीन कोर्स कोठेही असू देत तेथे ते फी भरून कोर्स घेऊ लागले.त्यांनी स्वत:ची दुरुस्ती साधने विकत घेतली. आज ते मिक्सर,घड्याळ,पंखा ,रेडिओ ,सीडी ,कॉम्प्युटर ,मोटार ,जुन्या काळातले रेडिओ ,ग्रामोफोन दुरुस्त करतात.त्यांचे हे काम पाहून ओळखीचे लोकही त्यांच्याकडे आपल्या घरातील वस्तू दुरुस्तीची कामे देतात .कोणतेही काम किचकट नसते ही त्यांनी आपल्या मनाशी पक्की समजूत करून घेतली आहे.त्यामुळे हे दुरुस्त होणार नाही ते दुरुस्त होणार नाही हा शब्दच त्यांच्याकडे नाही.सर्व किचकट दुरुस्तीची कामे ते स्वीकारतात.या सगळ्या छंदातून त्यांना फायदा झाला आहे तो,त्यांच्या प्रकृतीचा.या छंदात गुंतवून घेतल्यामुळे त्यांचा वेळ जातो.मन रमते . बीपी , शुगर औषधाच्या गोळ्या पासून ते लांब आहेत .आणि निवृत्तीनंतरचे एक समाधानी व्यस्त जीवन ते रोज अनुभवत आहेत.
छंद जपाच….
मी माझ्या तांत्रिक कामाचा जसा छंद जोपासला आहे ,तसा छंद प्रत्येकाने जपावा .सर्वांनाच तांत्रिक छंद जपता येणार नाही.पण चित्रकला ,वाचन ,गायन ,योग ,बांधकाम ,सांस्कृतिक कार्यक्रम , घराची स्वच्छता असे अनेक छंद आहेत.त्यापैकी एखादा छंद निवृत्तीनंतर जपा.बघा,निवृत्ती या शब्दाच्या फ्रेयात तुम्ही कधीच अडकणार नाही.
सर्जेराव सोनवणे









