अब्जावधी डॉलर्सचा निधी पुरविणार : लष्करी मदत देण्याचीही तयारी
वृत्तसंस्था/ ब्रुसेल्स :
रशियाविरुद्धच्या युद्धात कमकुवत झालेल्या युक्रेनला आता मोठा पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला मदत करण्यास नकार दिल्यानंतर युक्रेनी सैनिकांचे मनोबल घसरत होते. पण आता युरोपीय देशांनी युक्रेनला मदत करण्याचा उघड निर्धार केला आहे. साहजिकच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे मनोबल पुन्हा वाढू लागले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला मदत करण्यासाठी युरोपियन युनियनने अब्जावधी डॉलर्सचा अतिरिक्त निधी पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. ब्रुसेल्समध्ये युक्रेनच्या पाश्चात्य समर्थकांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर, ब्रिटिश संरक्षण मंत्री जॉन हेली यांनी 21 अब्ज युरोची नवीन लष्करी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. युक्रेनला देण्यात येणाऱ्या लष्करी मदतीत ही अभूतपूर्व वाढ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या रशियाच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच अमेरिकेच्या राजदूताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. युक्रेनने अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावाला सकारात्मकता दर्शवली असली तरी रशियाने दूरगामी अटी लादून तो प्रभावीपणे रोखला आहे. युरोपियन नेत्यांनी पुतिन यांच्यावर माघार घेतल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील याबाबत भाष्य करताना ‘युद्ध संपवण्यासाठी रशियाने पुढे आले पाहिजे. युद्ध ठभयानक आणि व्यर्थ आहे.’ अशी पोस्ट केली असली तरी रशियाने अद्याप युद्धबंदी प्रस्तावावर पुढचे पाऊल टाकलेले दिसत नाही.
अमेरिकेचा रशियावर युद्धबंदीसाठी दबाव
अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे पुतिन यांची भेट घेतली. विटकॉफ क्रेमलिनवर युद्धविराम स्वीकारण्यासाठी दबाव आणत आहे. त्यांनी यापूर्वी रशियाचे राजदूत किरील दिमित्रीव्ह यांची भेट घेतली होती. पुतिन आणि विटकॉफ यांच्यातील बैठक साडेचार तास चालली. या काळात दोघांनी युद्ध संपवण्याच्या पैलूंवर चर्चा केली.









