Europe Tourist Destination : युरोप हे एक असे ठिकाण आहे जिथे जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशी आपल्या प्रवासाच्या यादीत नाव समाविष्ट करतो. पण प्रत्येकाला युराप फिरणे शक्य होत नाही. यासाठी खूप नियोजन करावे लागते. आणि यासाठी पैसेही अधिक मोजावे लागतात. पण तुम्ही परफेक्ट नियोजन केले तर अगदी कमी पैशात म्हणजे ४ ते ५ दिवसात एक लाख रूपयात युरोप आरामात फिरू शकता. कसे चला जाणून घेऊया.

स्लोव्हाकिया हे एक बजेट डेस्टिनेशन आहे जिथे तुम्ही १ लाख रुपयांमध्ये प्रवास करू शकतात. येथे तुम्हाला अनेक जुने राजवाडे, सुंदर पर्वत आणि अनेक सुंदर लँडस्केप पाहायला मिळतील. स्कोव्हाशियामध्ये अन्न आणि वाहतूक खूप स्वस्त आहे. तुम्हाला येथे ३५०० ते ४५०० रुपयांमध्ये राहण्यासाठी चांगली जागा मिळेल.

रोमानियामध्ये तुम्हाला दगडापासून बनवलेले जुने मठ आणि चर्च पाहायला मिळतील. या संपूर्ण देशात तुम्हाला सुंदर लँडस्केप देखील पाहायला मिळतील. जर तुम्ही येथे जाण्यासाठी फ्लाइट तिकिटांचे आगाऊ बुकिंग केले तर तुम्हाला ५० हजार रुपयांचे तिकीट मिळेल. या देशात राहणे, खाणे आणि प्रवास करणेही स्वस्त आहे.

युरोपमध्ये वसलेले पोर्तुगाल आपल्या सुंदर बीचसाठी ओळखले जाते. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तुकला तुमचे मन जिंकेल. या सुंदर देशात तुम्ही फक्त १ लाख रुपयांत फिरू शकता. इथे राहण्यासाठी फक्त २ हजार रुपयांत हॉटेल्स मिळतील. येथे खाणे आणि प्रवास करणे देखील खूप स्वस्त आहे.

प्राग हे अशा युरोपियन शहरांपैकी एक आहे जिथे प्रत्येकाला भेट द्यायला आवडेल. प्रागला भेट देण्यासाठी तुम्हाला खूप पैसे द्यावे लागतील, तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. झेक प्रजासत्ताकमध्ये प्रवास करणे युरोपमधील अनेक देशांपेक्षा खूपच स्वस्त आहे. येथे राहण्यासाठी १५०० ते २५०० रुपयांमध्ये जागा मिळेल. इथे तुम्हाला जेवणही स्वस्तात मिळेल.

बल्गेरियात प्रवासी गाव, पर्वत आणि सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासाठी येतात. केवळ १ लाख रुपयांमध्ये तुम्ही या देशात मुक्तपणे फिरू शकता. इथे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. तुम्हाला इथे राहण्यासाठी १५०० ते २५०० रुपयांमध्ये चांगली जागा मिळेल.

हंगेरीला वास्तुकलेचा खजिना म्हटले जाते. येथे जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्ही या देशाला भेट देण्याचा विचार करत असाल तर बजेटची काळजी करू नका. इथे तुम्हाला ३००० ते ४००० मध्ये राहण्यासाठी चांगलं हॉटेल मिळेल.









