वृत्तसंस्था/ पॅरिस
इथिओपियाचा धावपटू तमिरत तोलाने पुरुषांच्या मॅरैथॉनमध्ये सुवर्णपदक पटकावत या खेळावरील केनियाचे वर्चस्व संपुष्टात आणले.
तोलाने 2 तास 6 मिनिटे 26 सेकंद या ऑलिम्पिक विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण केली. बेल्जियमच्या बशिर अब्दीने त्याच्यापेक्षा 21 सेकंद जास्त अवधी घेत रौप्य तर केनियाच्या बेन्सन किपरुटोने 34 सेकंद जास्त घेत कांस्यपदक मिळविले. दोन वेळचा विद्यमान विजेता राहिलेल्या केनियाच्या इलियुड किपचोगे मात्र यावेळी संघर्ष करावा लागला. तो तोलापेक्षा तब्बल आठ मिनिटे मागे राहिला होता. केनियाव्यतिरिक्त अन्य देशाच्या खेळाडूने मॅरेथॉन जिंकण्याचा प्रकार यापूर्वी 2012 मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये झाला होता. त्यावेळी युगांडाच्या स्टीफन किप्रोटिचने जेतेपद पटकावले होते.









