40 टक्के इथेनॉल अन् 60 टक्के इलेक्ट्रिक ऊर्जेने धावणार कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान जगातील पहिली इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स फ्यूल कारचा प्रोटोटाइप म्हणून एक कार सादर केली आहे. ही कार पूर्णपणे भारतातच विकसित करण्यात आली आहे. ही कार 40 टक्के इथेनॉल आणि 60 टक्के इलेक्ट्रिक ऊर्जेच्या मदतीने धावणार आहे.
पर्यायी इंधन आणि वायू प्रदूषण रोखण्याच्या दिशेने ही कार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कारच्या सादरीकरणावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि केंद्रीय मंत्री. डॉ. महेंद्र नाथ पांडे देखील उपस्थित होते.
ही नवीन कार 60 टक्के इलेक्ट्रिफाइड ऊर्जेने आणि 40 टक्के जैव इथेनॉलद्वारे धावणार आहे. फ्लेक्स फ्यूलमुळे कारच्या मायजेलमध्ये जी घट होणार आहे त्याची भरपाई यामुळे करता येणार आहे. या कारमध्ये ओल्ड स्टार्ट सिस्टीम अंतर्भाव असून यामुळे कारचे इंजिन उणे 15 अंश तापमानानही सहजपणे कार्यान्वित होऊ शकणार आहे.
इथेनॉल अधिक प्रमाणात पाणी शोषून घेत असल्याने इंजिनमधील हिस्स्यांना गज लागण्याचा धोका असतो. परंतु या कारमध्ये वापरण्यात आलेले इंजिन पूर्णपणे मेड-इन-इंडिया आहे. तसेच यातील सुटे भाग हे पूर्णपणे वॉटर रेजिस्टेंट आहेत. याचमुळे त्यांना गंज लागण्याचा धोका नाही. सध्या याचा प्रोटोटाइम तयार करण्यात आला असून लवकरच याची निर्मिती मॉडेल देखील जगासमोर येणार आहे.
काय असते फ्लेक्स फ्युल?
फ्लेक्स फ्युल एक विशेष प्रकारचे तंत्रज्ञान असते, जे वाहनांना 20 टक्क्यांहून अधिक इथेनॉलच्या वापराची सुविधा प्रदान करते. फ्लेक्स फ्युल गॅसोलिन (पेट्रोल) आणि मेथनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणाने तयार एक पर्यायी इंधन आहे. फ्लेक्स इंधनयुक्त वाहनाचे इंजिन एकाहून अधिक प्रकारच्या इंधनावर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात येतात.









