मुंबई :
मंगळवारी शेअर बाजारात इटर्नल अर्थात झोमॅटो कंपनीच्या समभागाचीच चर्चा होताना दिसली. चांगल्या तिमाहीतील कामगिरीसोबत भविष्यातील कामगिरीबाबतच्या संदेशानंतर इटर्नलचा समभाग बाजारात दमदार तेजीसह विक्रमी स्तरावर पोहचला होता. सुरुवातीच्या सत्रात 10 टक्यापर्यंत वाढलेला समभाग 15 टक्क्यापर्यंत वाढला होता. सरतेशेवटी इटर्नलचा समभाग 299 या भावावर बंद झाला.
22 जुलैला शेअरबाजारात इटर्नलचा समभाग 311 या सर्वोच्च पातळीवर पोहचला होता. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 3 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. विप्रो, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, कोल इंडिया, बजाज ऑटोसारख्या दिग्गज कंपन्यांच्या यादीत आता इटर्नलचा समावेश झाला आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत 25 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे जो मागच्या वर्षी 253 कोटी रुपये होता. पण याच तिमाहीत कंपनीने 7167 कोटींचा महसुल प्राप्त केलाय जो मागच्या तुलनेत 70 टक्के अधिक आहे. इटर्नलची क्वीक कॉमर्स ब्लिंकीटने पहिल्यांदाच झोमॅटोची एकंदर ऑर्डर मूल्य पूर्ण केले आहे. जेफरीजने समभाग 400 पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला आहे.









