मुख्यमंत्री बोम्माई यांची घोषणा : मागासवर्गीय कल्याण खात्याकडून आदेश जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने बिल्लव/ईडिग समुदायांच्या अनेक दिवसांच्या मागणीला राज्य सरकारने प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार श्री नारायण गुऊ विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली. मागासवर्गीय कल्याण खात्याने राज्यातील बिल्लव/ईडिग समाजाच्या विकासासाठी श्री नारायण गुऊ यांच्या नावाने विकास महामंडळ स्थापन करण्याचा आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री बोम्मयी यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती दिली आहे.
राज्यातील बिल्लव/ईडिग समुदायांची दीर्घकाळापासूनची मागणी असलेल्या श्री नारायण गुऊ विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. आणि याबाबत मागासवर्गीय कल्याण खात्याकडून आदेशही जारी करण्यात आला आहे. हे महामंडळ बिल्लव/ईडिगसह इतर 26 महत्त्वाच्या पोटजातींच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेल, असे म्हटले आहेत.
घटनेच्या कलम-15(4) नुसार, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश आणि 16(4) अंतर्गत नेमणुकीत आरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीयांची ओळख करत जात यादी जारी केली जाते. 2ए अनुक्रमांक 4(ए) ते (झेड) पर्यंत जाती यादीत सूचीबद्ध असलेल्या इडिगांसह एकूण 26 जातींसाठी शैक्षणिक आणि रोजगारामध्ये आरक्षण दिले जाईल, असे मागासवर्गीय कल्याण खात्याच्या सचिव शाहीन परवीन यांनी सांगितले.
या संदर्भात कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री सुनील कुमार यांनी ट्विटद्वारे माहिती देताना, राज्यातील बिल्लव समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी श्री नारायण गुरुंच्या नावाने विकास महामंडळ स्थापन करण्याची समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. राज्य सरकारने समाजाचे स्वप्न साकार केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे आभार मानू इच्छितो, असे ते म्हणाले.









